mr
Audio
Shivkrupanand Swami

Yuva Shakti Aur Chitta, Marathi (युवा शक्ती आणि चित्त)

Listen in app
पूज्य गुरुदेव समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी, त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विशेष संदेश देत आले आहेत. तरूण पिढी हा समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. युवाशक्ती एक फार मोठी शक्ती असते जी समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू शकते, समाजात संतुलन राखून त्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते, एका नवयुगाची निर्मिती करू शकते. ह्यासाठी तरूण पिढीने स्वत: संतुलित असणे, आपल्या ध्येयाबद्दल सजग असणे, त्या ध्येयावर ठाम असणे आवश्यक आहे. विशेषकरून आजच्या बुद्धिवाद, भौतिकवाद तसेच तंत्रज्ञानाच्या युगात तरूण पिढी भ्रमित झाल्याकारणाने होणार्‍या एकतर्फी विकासामुळे असंतुलित असा समाज निर्माण होऊ शकतो. म्हणून विकासाची योग्य दिशा दाखवणारे, योग्य तर्‍हेने विकास होण्यासाठी प्रेरणा देणारे हे संदेश बहुमूल्य सिद्ध होतील, कारण हे संदेश देणारे एक द्रष्टे आहेत जे भविष्यात उद्‌भवणार्‍या वैश्विक समस्यांना जाणून घेऊन समाजाला सावध करत आहेत.
आम्हाला अशी आशा आहे की, वाचक ह्या संदेशांना सखोलपणे समजून घेऊन त्यांचा योग्य तो लाभ घेतील.
1:16:08
Publication year
2021
Have you already read it? How did you like it?
👍👎
fb2epub
Drag & drop your files (not more than 5 at once)