mr
Audio
Shivkrupanandji Swami

Navyug Ki Aur (Marathi), नवयुगाकडे

Listen in app
‘समर्पण ध्यानयोग’ संस्काराचे प्रणेता सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजी मागील चौदा वर्षांपासून समर्पण आश्रम, दांडीमध्ये पंचेचाळीस दिवसांचे गहन ध्यान अनुष्ठान करत आले आहेत. ह्या दिवसांमध्ये पूज्य गुरुदेव सतत ध्यानाच्या उच्च अवस्थेत असतात आणि मनुष्यसमाजातील प्रत्येक वर्गाच्या लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी स्वहस्ते लिहिलेले संदेश पाठवत असतात.
पूज्य गुरुदेवांनी २०२० हे वर्ष ‘बाल वर्ष ‘ म्हणून घोषित केले आहे. आजच्या स्पर्धेच्या तणावपूर्ण युगात सर्व मुले निरोगी, सुरक्षित तसेच सुसंस्कृत असावीत, ह्या उद्देशाने पूज्य गुरुदेवांनी आपल्या ह्या वर्षी पाठवलेल्या लिखित संदेशांच्या संदेशांद्वारे समर्पण ध्यानयोग संस्काराशी जोडले जाण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. हे पुस्तक त्यांच्याच ह्या संदेशांचे संकलन आहे.
मुले समर्पण ध्यानसंस्कार ग्रहण करून नियमित ध्यानसाधनेद्वारे त्यांच्या आत दडलेल्या ऊर्जेला सक्रिय करून स्वत:चे सकारात्मक, शक्तिशाली सुरक्षाकवच निर्माण करू शकतात व नजीकच्या भविष्यात अजून वेगाने पसरणार्‍या नैराश्यासारख्या भयंकर विकारापासून स्वत:चे संरक्षण करू शकतात. ते सकारात्मक, संतुलित, यशस्वी, निरागसतेचे, सुखमय जीवन जगत असताना ह्याच जीवनात कर्ममुक्त अवस्था म्हणजेच मोक्ष प्राप्त करू शकतात. ही प्रक्रिया नक्कीच नवयुगाच्या निर्माणाच्या प्रवासातील एक मैलाचा दगड सिद्ध होईल. ह्या संदेशांच्या माध्यमातून मुलांबरोबर मोठ्यांनाही याचा लाभ मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
3:41:43
Publication year
2020
Have you already read it? How did you like it?
👍👎
fb2epub
Drag & drop your files (not more than 5 at once)