mr
Audio
Shivkrupanandji Swami

Life Management (Marathi), लाइफ मैनेजमेंट

Listen in app
भारतभूमीवर अनेक ऋषींनी वेळोवेळी अवतरीत होऊन आपल्या तप व साधनेने मनुष्य समाजाला संतुलित ठेवण्यासाठी आपले अमूल्य योगदान दिले आहे. समाजाला वेळोवेळी, गरजेनुसार त्यांचे मार्गदर्शन नेहमीच मिळत आले आहे. आपले सद्‌गुरु श्री शिवकृपानंद स्वामीजी सुद्धा कित्येक वर्षे हिमालयातील गुहांमधे ध्यानसाधना करून, तिथे मिळवलेले ज्ञान समाजात येऊन सर्व मनुष्यजातीला सतत नि:शुल्क वाटत आहेत.
हे अमूल्य, दिव्य ज्ञान, भावी पिढ्यांना देखील प्राप्त होवो ह्या उद्देशाने मागील दहा वर्षांपासून दरवर्षी ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान करून, ध्यानाच्या अत्युच्च अवस्थेत मंगलमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून त्या पृथ्वीच्या वेगवेगळ्या भूखंडात प्रस्थापित करण्याची प्रक्रिया गुरुदेवांनी सुरु केली आहे. ह्या ४५ दिवसांच्या गहन ध्यान अनुष्ठानाच्या वेळी पूज्य गुरुदेव आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनानुसार साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी लिखित संदेशसुद्धा देत असतात.
ह्या वर्षी देखील २२ जानेवारी पासून ७ मार्च २०१६ पर्यंत संपन्न झालेल्या ४५ दिवसीय दशम गहन ध्यान अनुष्ठानाच्या वेळी आजच्या काळाची गरज ओळखून आपल्या सहज-सरळ शैलीच्या माध्यमातून पूज्य गुरुदेवांनी दिव्य संदेशांद्वारे सर्व साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले आहे ज्याचे संकलन ह्या पुस्तिकेत केले आहे. त्यांच्या लेखन शैलीचे वैशिष्ट्य लक्षात ठेऊन काही आवश्यक शाब्दिक सुधारणा पूज्य गुरुदेवांनी अधिकृत केलेले माध्यम पूज्या गुरुमाँच्या स्वीकृतीनुसार केलेल्या आहेत.
1:26:47
Publication year
2020
Have you already read it? How did you like it?
👍👎
fb2epub
Drag & drop your files (not more than 5 at once)