mr
Audio
Shivkrupanand Swami

Messages from Gurutattva, Marathi (गुरुतत्त्वाचे संदेश)

Listen in app
मनुष्यजीवनातील सर्वात मोठे समाधान असते परमात्म्याला प्राप्त करणे. परमात्मा ही अशी विश्वचेतनाशक्ती आहे जी कालही विद्यमान होती, आजही आहे आणि उद्याही असणार आहे! परमात्माप्राप्तीचा एक खात्रीलायक मार्ग आहे, गुरुतत्त्वाशी जोडले जाणे आणि गुरुतत्त्वाशी जोडून घेण्याचा सोपा मार्ग आहे, वर्तमानकाळातील अशा माध्यमाची प्रार्थना करणे, ज्याच्या शरीराच्या माध्यमातून गुरुतत्त्व निरंतर प्रवाहित होत असते.

दिनांक २५ जानेवारी ते ११ मार्च २०२१च्यादरम्यान परमपूज्य शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पंधरावे गहन ध्यान अनुष्ठान संपन्न झाले. मागील वर्षात उद्‌भवलेल्या परिस्थितींनी आपल्याला सूक्ष्म चैतन्यशक्तीशी जोडले जाऊन अंतर्मुख होण्यास शिकवले आणि ह्याचाच सराव करत गुरुतत्त्वाशी जोडले जाण्याचा हे गहन ध्यान अनुष्ठान एक उत्तम संधी होती.

‘गुरुतत्त्वाचे संदेश’, ही पुस्तिका पूज्य स्वामीजींद्वारे ह्या अनुष्ठानादरम्यान दिल्या गेलेल्या संदेशांचे संकलन आहे ज्यामध्ये त्यांनी प्रत्येक साधकाचे व्यक्तिगत मार्गदर्शन करून त्यांचे आध्यात्मिक मार्गावर दिशानिर्देशन केले आहे. ह्या संदेशांद्वारे पूज्य स्वामीजींनी न केवळ गुरुतत्त्वाबद्दल ज्ञान दिले आहे, परंतु गुरुतत्त्वाशी एकरूप होऊन मोक्षाची स्थिती कशाप्रकारे प्राप्त केली जाऊ शकते हेही विस्तृतपणे समजावले आहे.
वाचकदेखील, ह्या पुस्तिकेमध्ये दिल्या गेलेल्या संदेशांचा लाभ घेऊन आपला जन्म घेण्याचा उद्देश प्राप्त करण्याच्या मार्गावर अग्रेसर व्हावेत, हीच शुद्ध प्रार्थना आहे.

4:09:54
Publication year
2021
Have you already read it? How did you like it?
👍👎
fb2epub
Drag & drop your files (not more than 5 at once)